Saturday, July 27, 2024
Homeनाशिकधामणी येथे समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे काही घरांची भिंत पडली तर काहींना तडे; ग्रामस्थांची...

धामणी येथे समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे काही घरांची भिंत पडली तर काहींना तडे; ग्रामस्थांची नुकसान भरपाईची मागणी

घोटी | प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील धामणी येथे मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. सदरचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड होण्याचे सत्र सुरूच आहे.

- Advertisement -

धामणीजवळ समृद्धीच्या कंट्रोल ब्लास्टिंगमुळे जास्त घरांना सतत हादरे बसत आहे. सोमवार दि. ९ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास येथील धनाजी भोसले यांच्या घराची भिंत पडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी अथवा विपरीत घटना घडली नसली तरी यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केमिकल ब्लास्टिंग देखरेखीखाली करण्यात येईल असा शब्द संबंधित कंपनीने दिला होता. मात्र तसे न करता कंट्रोल ब्लास्टिंग सुरूच आहे. येथील नागरिकांच्या नुकसान भरपाईच्या मागण्याही केवळ कागदावरच आहे.

काही दिवसांपूर्वी धामणी येथील ९६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. ते नागरिकही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. नुकसान भरपाईची मागणी मान्य न केल्यास येथील ९६ घरातील महिला उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या