Monday, April 28, 2025
Homeधुळेअपघातामुळे गो तस्कर पोलिसांच्या हाती

अपघातामुळे गो तस्कर पोलिसांच्या हाती

धुळे । dhule । प्रतिनिधी

गुरे चोरी करून ती कत्तलीसाठी (cow smuggler) नेणार्‍या भरधावचा कारचा पारोळा रोडवरील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यानजीक अपघात (accident) झाला. त्यात एक गाय व बैल ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत. तर एक जण पोलिसांना (police) पाहुन पसार झाला. याप्रकरणी पाच जणांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आज पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास आझादनगर पोेलिसांचे पथक पारोळा रोडवरून पेट्रोलिंग करत होत. त्यादरम्यान त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक कार भरधाव पुढे निघाली. मात्र शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षण भिंतीलगत अपघात होवून कार उलटली. पोलिसांनी मदतीसाठी वाहन थांबविले असता त्यांना पाहुन कारमधून एक पळुन गेला. तर वाहनात चार जण जखमी अवस्थेत तर दोन गायी व एक बैल मिळून आले. त्यातील एक गाय व बैल जागीच ठार झाला.

चौघांनी त्यांची नावे रशीद शफीक शेख (वय 40, रा.अंबिका नगर, चाळीसगांव रोड, धुळे), मोहम्मद सलीम शब्बीर अहमद (वय 30, रा.100 फुटी रोड, जामचा मळा, फातमा मशिदी जवळ, धुळे), सैय्यद रसुल सैय्यद सत्तार (वय 40, रा.वडजाई रोड, काझी प्लॉट, ग.नं. 2, धुळे) व शशिकांत सदाशिव मोरे (वय 48 रा.दंडेवालाबाबा नगर, तिखी रोड, मोहाडी उपनगर) अशी सांगितली. तर पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अफजल ऊर्फ डल्ल्या (वय 30 रा.अंबीका नगर, धुळे) असे सांगितले.

या पाचही जणांनी गाय व बैल कोठून तरी चोरुन आणून त्यांचे निर्दयपणे पाय बांधून त्यांना एमएच 04 डीएन 3741 क्रमांकाच्या कारमध्ये कोंबून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक करुन घेवून जात होते. त्यादरम्याशन भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात करुन वाहनातील एक गाय व एक बैल यांचे मृत्यूस तसेच स्वःताचे व एका गायीच्या दुखापतीस जबाबदार ठरले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Neha Singh Rathore : पहलगाम हल्ल्यासंदर्भात ‘चिथावणीखोर’ पोस्ट; गायिका नेहा सिंग...

0
दिल्ली । Delhi प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिच्याविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत...