Saturday, July 27, 2024
Homeनाशिकऐन पावसाळ्यात येवला तालुका तहानलेलाच; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल

ऐन पावसाळ्यात येवला तालुका तहानलेलाच; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल

ममदापूर |वार्ताहर

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे. विहिरी बंधारे कोरडे असल्यामुळे गावांची तहान पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरने भागवली जाते त्यामुळे बैलपोळा सणाला बैल धुण्यासाठी अक्षरशा शेतकरी बादलीभर पाण्यात बैलाला आंघोळ घालताना दिसत आहे.

- Advertisement -

त्यामुळे बैल पोळा सणाचा शेतकरी वर्गाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने सुरवातीपासून दडी मारल्यामुळे मका, मुग, बाजरी, या पिकांची पेरणी रिमझिम पावसात केली होती पण नंतर पाऊस झाला नाही त्यामुळे पाण्या अभावी पीके करपून गेली आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

यानंतरचे जीवन कसे जगावे याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे, पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा पावसाची प्रतीक्षा बघत बसलेला शेतकरी आज आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. रोजचा येणारे दिवस आजना उद्या तरी पाऊस पडेल अशी आशा लावून बसला आहे.

भविष्यात मुलांचे शिक्षण आजारपण यासाठी आर्थिक टंचाईला सामोरे कसे जायचे याची चिंता भेडसावत आहे. शेतकरी राजा चा बैलपोळा हा सणावर पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट ओढवलेला आहे बैल राजाची सजावट करण्यासाठी शेतकरी आर्थिक दृष्ट्या खचला असल्यामुळे बैल सणावर दुष्काळाचे सावट ओढवले आहे त्यामुळे मोठ्या पावसाची शेतकरी राजा प्रतीक्षा करतो आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या