Saturday, July 27, 2024
Homeनाशिकचारा भाव खातोय; मक्याच्या दाण्या ऐवजी कुट्टी ला प्राधान्य

चारा भाव खातोय; मक्याच्या दाण्या ऐवजी कुट्टी ला प्राधान्य

महेश शेटे | प्रतिनिधी

जिल्ह्यात असंतुलित पाऊस असल्यामुळे काही ठिकाणी मका व बाजरी ची वाढ झालेली आहे तर काही ठिकाणी प्रतिकूल पावसामुळे मका बाजरीने भुई ही सोडलेली नाही. त्यामुळे चाऱ्याची मोठी मागणी दिसून येत आहे.

- Advertisement -

दरवर्षी मोफत दिला जाणारा बाजरीचा चारा यावर्षी चांगल्या किमतीला विकला जात आहे. प्रतिकूल पाऊस असणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागातून तसेच येवला व नांदगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व व पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी निफाड व येवला तालुक्याच्या पश्चिम भागात पिकलेला चारा मिळेल ती किंमत देऊन विकत घेत आहे.

मकाच्या चाऱ्या पाठोपाठ आता बाजरीच्या चाऱ्यालाही एकरी चार ते पाच हजार रुपये भाव दिला जात आहे. तर दरवर्षी खळ्यावरतीच पावसाने भिजून खत होऊन जाणारे सोयाबीनचे भूस अजून सोयाबीन सोंगनीला येण्याआधीच शेतकरी इसार देऊन जात आहे.

दरवर्षी मकाचे दाणे करून सोंगनीचे पैसे देऊन चारा घेऊन जा असे म्हणणारे शेतकरी आता मकाची बिट्टी परिपक्व होण्यासाठी महिना पंधरा दिवस बाकी असतानाच दूध व्यवसायिकांना कुट्टीसाठी एकरी ४५ ते ७० हजार रुपये किंमत घेऊन विक्री करत आहे. जवळपास ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांनी मकाच्या दाण्या ऐवजी कुट्टी साठी मका विक्रीला प्राधान्य दिल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामातून मकाच्या होणारे उत्पादनात मोठी घट होणार आहे.

त्यामुळे कोंबडी खाद्यासाठी मकाच्या दाण्यांची पूर्तता होणेही मोठे कठीण होईल. त्यामुळे निश्चितच यावर्षी मकाच्या दाण्यांनाही चांगला भाव मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांना जरी प्रतिकूल पावसामुळे कांदा पीक घेणे शक्य होणार नसले तरी किमान वर्षभराचे भांडवलाचे काम व खर्चाचे कामे होईल इतके उत्पन्न मिळेल अशा पल्लवीत झाल्या आहेत.

काय आहे मकाची कुट्टी ?

मका सोंगणी ला येण्याच्या २५ ते ३० दिवस आधी कनिसासह मशीन मध्ये घालून भरडली जाते. यामध्ये मकाचे ताट व बिट्टी दोघांचाही चुरा केल्या गेल्यामुळे एक प्रकारे आम्लधर्म प्राप्त होतो. हा चुरा बारदानाच्या अथवा पॉलिथॉनच्या बॅगमध्ये प्लास्टिकचे इनर टाकून साठवला जातो. साधारणपणे एक टन ते सहा-सात टनापर्यंत वजनाच्या बॅग बाजारात उपलब्ध असतात. या बॅगमध्ये वर्षभर हा चुरा व्यवस्थित राहतो जशी गरज पडेल तशी जनावरांना टाकला जातो.

कुट्टी साठी मकाला भेटणारा भाव १३०० ते १८०० रुपये गुंठा

बाजरीच्या चाऱ्याला भेटणारा भाव एकरी ३००० ते ६००० रुपये.

एक एकर सोयाबीनच्या भुसासाठी भेटणारा भाव ३००० ते ५०००.

- Advertisment -

ताज्या बातम्या