पिंपळनेर । Pimpalner । वार्ताहर
अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) पिकांना फटका (Crops hit) बसल्यामुळे मनस्थिती खालावल्याने सामोडे जुनागाव येथील 47 वर्षीय शेतकर्याने (farmer) रविवारी दुपारी आत्महत्या (suicide) केली.
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी ज्येष्ठ नागरिक आहात तर मग ही हेल्पलाईन आहे खास तुमच्यासाठी.. वाचाच
सुनील दाजमल घरटे उर्फ भाऊसाहेब (वय 47) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. शनिवारी अक्षय्य तृतीयेच्याच्या दिवशी सायंकाळी सामोडे पिंपळनेर परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने परीसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. सुनिलच्या शेतात कांदे व गव्हाचे पीक असून पीक आता काढणीवर आले होते. परंतु अक्षय्यतृतीया असल्याने मजूर मिळणे अशक्य झाले.
शिदे गटाचे आमदार किशोर पाटील म्हणतात… आर.ओ .तात्यांचा मी खरा वारसदारहस्तीच्या 72 विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार!ज्ञानेश्वर भामरे म्हणतात…भाजपाकडे बघून मते दिली, पण त्यांनी गद्दारी केली!
तर शेतकर्याने दोन दिवसानंतर काढणी करू असा विचार केला मात्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्याने लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतली. वडिलानी दरवाजा बंद दिसला नंतर मागच्या दरवाज्यातून आत शिरल्यानंतर सुनील यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
मनाई आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी 25 जणांविरुद्ध गुन्हा