नाशिक | प्रतिनिधी Nashik
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा (Dugarwadi water fall tal trimbakeshwar) परिसरात काही पर्यटक तरुण आणि तरुणी अडकल्याची घटना काल (दि ०७) रोजी घडली होती. या पर्यटकांना मध्यराती दीड वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. तर एक तरुण वाहत्या पाण्यात वाहून गेला होता. त्याच्यासाठी बचावकार्य आज सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह मिळून आला असून तब्बल चार तासांची कसरत करत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला….
या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Collector Gangatharan D) यांनी तत्काळ पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. दुगारवाडीसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Dugarwadi) परिसरतील ब्रम्हगिरी (Brahmgiri), पहिने, (Pahine) इगतपुरी (Igatpuri) परिसरातील काही भाग तसेच निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
जीवाची पर्वा न करता धोक्याच्या ठिकाणी अनेकजण जाताना दिसून येतात. त्यामुळे या सर्वावर निर्बंध म्हणून जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना संबंधित तहसीलदारांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटक तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी न जाण्याचा इशारा देखील यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी दिला आहे.