Friday, September 20, 2024
Homeनगरडंपरच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

डंपरच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहरातील न्यू टिळक (New Tilak Road) रोडवर पटेल मंगल कार्यालयाकडे वळणार्‍या चौकात भरधाव वेगातील डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने (Dumper And Bike Accident) मोटारसायकलवरील प्राथमिक शिक्षकाचा जागीच मृत्यू (Teacher Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.14) दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. संजय बाबाजी वामन (वय 51, रा. पाईपलाईन रोड, अहमदनगर, मूळ रा. देवगाव, ता.नगर) असे या मयत शिक्षकाचे नाव आहे.

संजय वामन हे नगर तालुक्यातील निमगाव घाणा (Nimgav Ghana) येथील कोल्हेटेक वस्तीवरील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. जिल्हा परिषदेत शनिवारी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन समुपदेशाने बदलीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी ते नगर शहरात आले होते. दुपारी 12.30 च्या सुमारास ते न्यू टिळक रोडने मोटारसायकलवर (क्र. एम.एच.16 सी. आर. 9582) जात असताना सक्कर चौकातून आयुर्वेद चौकाकडे भरधाव वेगात जाणार्‍या डंपरने (Dumper) नंदनवन हॉटेलच्या पुढे पटेल मंगल कार्यालयाकडे वळणार्‍या चौकात त्यांच्या मोटारसायकलला धडक (Bike Hit) दिली.

या धडकेत संजय वामन हे ढंपरच्या चाकाखाली सापडून जागीच मयत झाले. अपघातानंतर डंपर चालकाने डंपर वेगात पुढे नेवून तो पसार झाला. अपघातानंतर (Accident) परिसरातील दुकानदारांनी व काही नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावून वामन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात (Kotwali Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर संबधित डंपर चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत संजय वामन यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या