Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदसरा मेळावा : आमचं सरकार आल तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …. -...

दसरा मेळावा : आमचं सरकार आल तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …. – उद्धव ठाकरे

मुंबई

- Advertisement -

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आज संध्याकाळी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मेळाव्यासाठी मुंबई,ठाण्यासह पालघर, नवी मुंबई,नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने हजार झाले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण हे मुख्य आकर्षण होते. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापासून भाजपला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय संबोधीत करतात या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

राज्यात आपली सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, प्रभू श्रीरामांची जशी मंदिरं आहेत, तसेच आमच्या शिवरायांची मंदिरं बांधण्यात येतील, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.

या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला.आज माझ्याबरोबर जनता आहे. जनतेचं पाठबळ मला नसतं तर मी उभा राहू शकलो नसतो. मला दिल्लीकरांची परवा नाही. त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी मी त्यांना गाडून त्यांच्या भगवा फडकवल्या शिवाय राहणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

शिवसेना उबाठा पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आता आरपारची लढाई सुरु झाल्याची भाषा त्यांनी केली. राज्य सरकारने गेल्या ११ दिवसांत १६०० शासन निर्णय या सरकारने जारी केले आहे. दोन महिन्यांत आम्ही यामधील अनेक निर्णय रद्द केल्याशिवाय राहणार नाही, मी काही झालं तरी हा महाराष्ट्र भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मोदी शाह यांच्या हाती जाऊ देणार नाही.असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी शपथसुद्धा घेतली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या