मुंबई | Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का बसला आहे. भारताची सर्वोत्तम महिला धावपटू दुती चंदही डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तिच्याकडे पदकाची आशा म्हणून पाहण्यात येत होते.
डिसेंबर महिन्यात दुतीने चाचणीसाठी दिलेल्या नमुन्यात SARM आढळले. द्युतीची चार वर्षांची बंदी ३ जानेवारी २०२३ पासून लागू होईल. दुती चंदने २०२१ सालच्या ग्रां प्रीमध्ये १०० मीटरची शर्यत ११.१७ सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, जो अजूनही कायम आहे. तिच्या या डोपिंग टेस्ट मध्ये दोषी आढळल्याने भारताच्या पदकांच्या आशांना धक्का बसला आहे. ऐन आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडावर असताना आलेला हा निकाल म्हणजे क्रीडा प्रेमींसाठी खूप निराशाजनक आहे.
दुती चंदवर बंदी घालण्यात आल्याने पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देखील ती सहभागी होऊ शकणार नाही. दुतीची चाचणी झाली. त्यात सिलेक्टिव्ह एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (एसएआरएम) आढळले. द्युतीवर लादलेली चार वर्षांची बंदी जानेवारी २०२३ पासून विचारात घेतली जाईल. २०२१ मध्ये त्याने ग्रां प्रीमध्ये १०० मीटरची शर्यत ११.१७ सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला. द्युतीने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी करत देशाची मन उंचावली आहे.