Monday, July 22, 2024
HomeUncategorizedद्वारका वाहतुकीला झेब्राक्रॉसिंग चा खोडा

द्वारका वाहतुकीला झेब्राक्रॉसिंग चा खोडा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

शहरातील सर्वात गर्दीचा व वाहतुक कोंडी असणारा द्वारका सर्कलवर सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे. मात्र झेब्राक्रॉसिंग नसल्याने नागरीकांना हा चौक पार करण्यासाठी दिव्यातून जावे लागत आहे. तर वाहने अडकून पडत असलने पुन्हा वाहतुक कोंडी निर्माण होत आहे.

शहरातील दोन महमार्ग व सर्वाधिक आठ रस्ते एकत्र येणार्‍या द्वारका चौकातील वाहतुक कोंडीपुढे प्रशासनाने हात टेकले आहेत. यासाठी विविध जज्ञांनी विविध उपायोजना सांगीतल्या मात्र त्या आंमलात आणणे खूप खर्चीक व वेळखाऊ असल्याने सध्यातरी त्यावर दहा सिग्नल द्वारे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. यामुळे काही प्रमाणात वाहतुक सुरूळीत सूरू झाली आहे.

मात्र, सिग्नलसाठी पुरक असलेली झेब्रा क्रॉसींग टाकण्यास पालिका प्रशासनाला मुहुर्त न सापडल्याने वाहतुक सुरळीत होण्यात आडकाठी येत आहे. पोलीस वाहतूक शाखेने महापालिका प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे. मात्र याकडे अद्याप दुर्लक्ष आहे.

झेब्रा क्रॉसिंग नसल्याने एक सिग्नल सुरू असताना दुसर्‍या सिग्नलवरील वाहनचालक थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत येऊन थांतात. वाहन कोठे थांबवावे याचे मार्गदर्शनच येथे उपलब्ध नसल्याने वाहनचालक थेट पुढे जाऊन इतर वाहनांना अडथळा निर्माण करतात. वाहतूक पोलिस नसताना येथे तर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो.

यासाठी येथील सिग्नल यंत्रणेतील अर्धवट काम कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले. तसेच वाहने एकमेकांका क्रॉस होऊ नयेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरकेडींग करण्यात आली. बॅरकेडींगमुळे हा रस्ता अरूंद होतो. मात्र वाहनचालकांनी रेड सिग्नल असताना कोठे थांबावे, याचे मार्गदर्शनच मिळत नाही.

एवढा मोठा सिग्नल असताना येथे आतापर्यंत साधे झे्रा क्रॉसिंगचे कामही करण्यात आलेले नाही. नाशिककडून औरंगाबाद वा पुण्याकडे जाताना वाहने थेट पुढे येतात. परिणाम पुणे अथवा मुंई नाक्याकडून येऊन औरंगाबाद अथवा वळण घेऊन पुण्याकडे जाणार्‍या वाहनांना अडथळे निर्माण होतात.

काही दुचाकी व रिक्षाचालक तर थेट दुसरा सिग्नल चालू असताना हा रस्ता क्रॉस करण्याचे काम करतात. यामुळे वाहतूक कोंडीस सुरूवात होती. सिग्नल व्यवस्थेतील ही त्रुटी समोर आल्याने वाहतूक शाखेने महापालिकेस झे्रा क्रॉसिंगचे काम त्वरीत हाती घ्यावे, यासाठी पत्र दिले आहे.

मात्र महापालिकेच्या चालढकलीच्या धोरणाचा फटका नाशिककरांना सत आहे. आता पालिका केव्हा झे्रा क्रॉसिंग टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर वाहतुकीत अधिक सुधारणा.. द्वारका सर्कल हा वाहतुकीसाठी सर्वात गर्दीचा चौक आहे. या ठिकाणी दोन महामार्ग तसेच इतर असे 8 पेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात. अशातच पुणे महार्माकडून येणारे मोठे कंटेनर तसेच मोठी वाहने वळण घेण्यास अडचण येत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडते. या ठिकाणी सर्व बाजुंनी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करून वाहतुक नियंत्रित केली जात आहे. सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग नसल्याने वाहने दुसर्‍या लेनमध्ये उभी राहिल्याने अडथळा येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सिताराम गायकवाड, सहाय्यक आयुक्त वाहतुक

- Advertisment -

ताज्या बातम्या