Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशशंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | Delhi

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला…

- Advertisement -

स्वामी शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरू मानले जात.

राम मंदिर लढ्यात शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा राहिला. स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही दांगडा होता. एकूणच धार्मिक वर्तुळातलं शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती हे नाव मोठं होतं. १९८१ साली त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. त्यांच्याकडे बद्री आश्रम आणि द्वारकापीठाची जबाबदारी होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या