Thursday, December 12, 2024
Homeनगरकरोना संकटातही विकास कामांसाठी प्रयत्न

करोना संकटातही विकास कामांसाठी प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना (Corona’s third wave Fight) करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज (District Administration Ready)आहे. नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाटी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) 74 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा (Flag hoisting ceremony) पालकमंत्री मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले (Zilla Parishad President Rajshri Ghule), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (Zilla Parishad CEO Rajendra Kshirsagar), जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील (SP Manoj Patil), महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. अशावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.

स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे. करोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिली कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित केली. सध्या चाचण्यांची संख्या प्रतिदिन 15 हजारांहून अधिक वाढविली आहे. एकूण 23 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात नव्याने 14 पीएसए प्लांट उभारत असून त्यातील काही सुरुही झाले आहेत. संभाव्य तिसर्‍या लाटेत आवश्यक ऑक्सीजन व्यवस्था आपण उभी करीत आहोत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करोना उपाययोजनांच्या अनुषंगाने 100 कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून 50 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे सांगून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न असून आतापर्यंत 13 लाख 72 हजाराहून अधिक डोसेस दिले आहेत. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास पावणेतीन लाख शेतकर्‍यांना 2 हजार 202 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाचा वेग अधिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात ई-पीक पाहणी (E-Crop Survey) अभियानास सुरुवात झाली असून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद आता अ‍ॅपद्वारे स्वता करता येणार आहे, यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांमार्फत पीकपेरा नोंद केली जात होती. आता शेतकरी स्वता ती नोंद करु शकतील. डीजीटल कृषी क्रांतीपर्वाकडे (Digital agricultural revolution) आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या काही तालुक्यात सलग तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या काळात पुरेसा पाऊस पडेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या