Friday, October 11, 2024
Homeमनोरंजन'अवतार' चा बॉक्स ऑफिसवर धमाका;'इतक्या' कोटींची केली कमाई

‘अवतार’ चा बॉक्स ऑफिसवर धमाका;’इतक्या’ कोटींची केली कमाई

मुंबई | Mumbai

बॉक्स ऑफिसवर आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने नवा विक्रम आपल्या नावी नोंदविला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीने अव्वल स्थानावर पोहचलेल्या या चित्रपटाने कमाईने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धमाका उडविला आहे.

- Advertisement -

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड चित्रपटाने भारतात सर्वाधिक कमाई करत आपल्या नवे नवा विक्रम रचला आहे. याआधी जेम्स कॅमरुन दिग्दर्शित अॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाच्या नावे ३६७ कोटी इतक्या कमाई चा विक्रम नोंद होता आता मात्र, त्यालाही मागे टाकत बॉक्स ऑफिसवर ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने ३६८.२० कोटी इतकी कमाई मिळवत अव्वल स्थान मिळविले आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी अवतारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे त्यात त्यांनी सांगितले की, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अॅव्हेंजर्स एंडगेमच्या कमाईला मागे टाकत आता नवा विक्रम रचला आहे.’

अवतार २ ने पहिल्या आठवड्यात १८२.९० कोटी, दुसऱ्या आठवड्यात ९८.४९ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ५४.५३ कोटी तर चौथ्या आठवड्यात २१.५३ कोटींची कमाई केली. तर आता जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात ९.४५ कोटी आणि सहाव्या आठवड्यात १.३० कोटींची कमाई केली. भारतात अवतार २ ने तब्बल ३६८.२० कोटींची माया जमवली आहे.

जगभरातील अवतार २ची कमाई पहाता चित्रपटाने १ अब्जचा टप्पा आधीच पार केला असून आता हा चित्रपट २ अब्जची नक्कीच कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कॅट विल्सन, सॅम वर्थिंग्टन, झो सलडाना, सिगॉर्नी वीव्हर आणि स्टिफन लँग हे आहेत. अवतारने जागतिक स्तरावर $1.93 बिलियनची कमाई केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पायडर-मॅनने $1.92 बिलियनची कमाई केली होती. डिस्नेने या आठवड्याच्या सुरुवातीला ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या