Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशVIDEO : राजस्थानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत

VIDEO : राजस्थानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत

जयपूर। Jaipur

राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. जयपूरमध्ये पहाटे 4.10 ते 4.23 पर्यंत मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. राजघनीसह राज्यातील इतर शहरांमध्येही साडेचार वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की लोकांना स्फोटक आवाज ऐकू आला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडताना दिसले.

- Advertisement -

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या वेबसाइटनुसार राजस्थानमध्ये पहाटे 4.09 वाजता पहिला भूकंप झाला. दुसरा 4:22 वाजता आणि तिसरा भूकंपाचा 4.25 वाजता जाणवला. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. पहाटेच झालेल्या या भूकंपाने झोपलेले सर्वच लोक जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक फोनवर त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती घेताना दिसत होते.

प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरवली डोंगररांगा आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी होती. राजधानी जयपूर आणि आसपासच्या परिसरात पहाटे हे भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, जयपूर आणि राजस्थानच्या इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 24 जानेवारी आणि 21 मार्च रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या