Friday, May 24, 2024
Homeदेश विदेशEarthquake : भीषण भूकंपाने अंदमान-निकोबार हादरलं!

Earthquake : भीषण भूकंपाने अंदमान-निकोबार हादरलं!

दिल्ली । Delhi

तीन दिवसांपूर्वी राजस्थानात झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतानाच आता अंदमान-निकोबार बेटावरून खळबळजनक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे अंदमान आणि निकोबार बेटांवर भीषण भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरपासून १२६ किमी आग्नेय भागात हा भूकंप झाला असून त्याची खोली ६९ किमी असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी पहाटे भीषण भूकंप झाला. त्यामुळं घाबरलेल्या नागरिकांनी जीवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली. घरातील लहान मुलं आणि वृद्धांना स्थानिकांकडून वाचवण्यात आलं असून अनेक इमारतींची पडझड झाल्याची माहिती आहे. राजधानी पोर्ट ब्लेयर शहर आणि परिसरात मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं असून इमारतीखाली दबलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. भीषण भूकंपाच्या घटनेने दोन्ही बेटांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झालं आहे. याशिवाय एनडीआरएफचं पथकही भूकंपग्रस्त बेटांवर दाखल झाल्याची माहिती आहे. भूकंपाच्या घटनेत मोठी वित्तहानी झाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या