Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगपृथ्वीची ढाल

पृथ्वीची ढाल

जगभरात वायुप्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत असून विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. ठोस पावले न उचलल्यास आणखी धोकादायक परिणाम समोर येऊ शकतात. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. हा थर पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. त्याला बसणार्‍या धक्क्यामुळे लोकांच्या जीवाला असलेला धोका सातत्याने वाढत आहे.

जगभरात, विशेषत: मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. ओझोनचा थर पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. या थराला होणार्‍या नुकसानीमुळे लोकांच्या जीवाला असलेला धोका सातत्याने वाढत आहे. ओझोन हा वायू वातावरणात असतो, त्याचा रंग हलका निळा असतो. ओझोन थराला ओझोन ढाल देखील म्हणतात. कारण ओझोन सूर्यापासून हानिकारक अतिनील किरणे शोषून घेतो आणि अतिनील किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून अडवतो. या किरणांमुळे कर्करोगासारखे अनेक घातक आजार होऊ शकतात.

ओझोनच्या थराला नुकसान करणार्‍या प्रदूषणाला ओझोन प्रदूषण म्हणतात. ओझोन प्रदूषण ही आजची एक मोठी समस्या आहे. जंगलतोड, पाणी प्रदूषणासह रेफ्रिजरेटर आणि एसीसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापरही ओझोनसाठी घातक आहे. ओझोन थर आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. प्रदूषणामुळे ओझोनचा थर तुटत आहे. ओझोन प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचा त्रास, दमा, खोकला आणि वेदना, फुफ्फुस कमजोर होणे, जळजळ, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखणे असे प्रकार वाढत आहेत. ओझोन प्रदूषण प्रत्येकाला प्रभावित करते. ओझोनचा थर पूर्वीसारखा व्हावा म्हणून जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ओझोनचा थर पुढील चार दशकांमध्ये पूर्ण पुनर्प्राप्ती करील, अशी बातमी आहे, जी पर्यावरणप्रेमी आणि आपल्या ग्रहाच्या हितचिंतकांना रोमांचित करणारी आहे. त्यातून नव्या शक्यता आणि नव्या आशाही निर्माण झाल्या आहेत. एवढी मोठी खगोलीय समस्या सोडवता येत असेल तर पृथ्वीच्या पर्यावरणीय आणि हवामानाच्या समस्या का सुटू शकत नाहीत?

- Advertisement -

1980 चे दशक पृथ्वीच्या जीवनाला आधार देणार्‍या ओझोन थरामध्ये छिद्र पडल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. त्यामुळे जीवसृष्टीला मोठे धोके निर्माण झाले होते. ती चिंता आजही माणसाच्या मनात आहे. ओझोनचा क्षय होत गेला तसतसा त्याचा जीवरक्षक थर इतका पातळ झाला की लोक त्याला छिद्र म्हणू लागले, पण यावर्षी जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) आणि जागतिक हवामान संघटनेने (डबल्यूएमओ) जारी केलेल्या अहवालात ओझोनच्या थरातील छिद्र हळूहळू भरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी हितचिंतकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संशोधकांच्या मते, 2018 च्या तुलनेत ओझोनच्या थराच्या जाडीत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळून आले असून येत्या चार दशकांमध्ये हा थर पूर्णपणे पूर्वस्थितीत येईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यूएन-समर्थित वैज्ञानिकांचा गट ओझोन थराच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला हवेतील रसायनांमध्ये घट झाल्याचे कारण देतो. अहवालात दिसून आले आहे की, जवळजवळ 99 टक्के ओझोन कमी करणारे प्रतिबंधित पदार्थ वातावरणातून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणातील स्ट्रॅटोस्फियर विभागातील ओझोनचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचा थर घट्ट होत आहे.

तथापि ओझोनच्या क्षीणतेची कथा आणि ते सोडवण्यासाठी जगभरातील प्रयत्नांची कथा मनोरंजक आणि जाणून घेण्यासारखी आहे. 1930 च्या दशकात, शोधक थॉमस मिडगेले यांनी जगाला ओझोन थराचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या क्लोरोफ्लोरोकार्बन्सची ओळख करून दिली. रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनिंग, फास्ट फूड पॅकेजिंग, प्रोपलेंट्समध्ये वापरलेले स्वस्त, ज्वलनशील रेफ्रिजरंट आदींमुळे ओझोनचा थर पातळ होतो. विशेष म्हणजे औद्योगिक युगापूर्वी ‘सीएफसी’ नावाचे प्रदूषक अस्तित्वात नव्हते. ‘सीएफसी’ रसायने औद्योगिक युगाची उपउत्पादने आहेत. सीएफसी स्ट्रॅटोस्फियरमध्ये वाढतात आणि जमा होतात. ते सूर्याच्या अतिनील प्रकाशामुळे तुटतात, या प्रक्रियेत ते क्लोरीन अणू सोडतात. क्लोरीनचा एक अणू ओझोनचे दहा हजारांपेक्षा जास्त रेणू नष्ट करू शकतो.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे दोन रसायनशास्त्रज्ञ मारिओ मोलिना आणि शेरवूड रॉलंड यांनी 1974 मध्ये ‘नेचर’ या जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित केला होता. त्यात मानवामुळे वाढणार्‍या ‘सीएफसी’जमुळे ओझोन कमी होण्याची तपशीलवार माहिती दिली होती. 1985 मध्ये ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणातील तीन शास्त्रज्ञांनी ‘नेचर’ या जर्नलमध्ये 1980 च्या दशकात अंटार्क्टिकामध्ये वसंत ऋतूमध्ये दिसलेल्या ओझोन छिद्राच्या घटनेबद्दल अहवाल देणारा एक पेपर प्रकाशित केला. या वर्षापासून ओझोन थर कमी होण्याबाबत जगभरात चिंतन, चिंता, विचारमंथन, परिषदा, उपाययोजना आणि धोरणांची न संपणारी मालिका सुरू झाली. मग 1990 आणि 2000 च्या दशकात ओझोनच्या थरातील छिद्र आणखी वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली जात होती आणि तसेच झाले.

1987 मध्ये कॅनडामध्ये 46 देशांनी ‘सीएफसी’जवर बंदी घालण्याच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली होती. त्यात 1999 पर्यंत जगभरातल्या ‘सीएफसी’मध्ये 50 टक्के कपात करण्याचे आवाहन केले गेले. लंडन (1990), कोपनहेगन (1992), व्हिएन्ना (1995), मॉन्ट्रियल (1997), बीजिंग (1999) यासारख्या परिषदांमध्ये कॅनडामधील ठरावानंतर अनेक सुधारणा केल्या गेल्या. त्यानंतर 2016 मध्ये किगालीमध्ये शेड्यूल फेज करण्यासाठी आणि नियंत्रित पदार्थांच्या यादीत नवीन पदार्थ जोडण्यासाठी करार झाले आणि स्वाक्षरी करणार्‍या राष्ट्रांची यादी 200 झाली.

ओझोन कमी करणार्‍या रसायनांवर (मॉन्ट्रियल प्रोटोकॉल) नियंत्रण आणून पृथ्वीच्या ओझोन थराचे संरक्षण करण्याचा पहिला प्रयत्न 1 जानेवारी 1989 रोजी अंमलात आला, बहुतेक देशांनी ‘सीएफसी’ उत्सर्जन प्रभावीपणे कमी करण्याचा आग्रह धरला. पण 1990 च्या दशकात चीन, दक्षिण कोरिया आणि फिलिपिन्ससारख्या काही देशांनी वेगाने ‘सीएफसी’ उत्सर्जन वाढवले. पण एकंदरीत असे दिसते की, अखेरीस ओझोन थराला पॅचिंग करून जग आपले संरक्षण कवच पुन्हा मजबूत करेल. संशोधकांच्या मते, अंटार्क्टिकामध्ये पसरलेला ओझोनचा पातळ थर 2021 मध्ये 23.3 दशलक्ष स्क्वेअर किलोमीटरपर्यंत भरू लागला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल ‘डब्ल्यूएमओ’चे सरचिटणीस पीटरी तालास म्हणतात, ओझोनविषयक कृतीने एक आदर्श ठेवला आहे. ओझोन कमी करणारी रसायने टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात यश दिसून येत आहे. ओझोन थरातील छिद्र हळूहळू भरणे हे जगभरातील देशांनी समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करण्याचे एक अद्भूत आणि अनुकरणीय उदाहरण आहे आणि हे यश हवामानबदलाच्या दिशेने कृती करण्याचा मार्ग मोकळा करते. आपण आकाश वाचवू शकतो, तर आपली पृथ्वी का नाही?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या