Sunday, October 20, 2024
Homeजळगावइको गाडीला ट्रकची धडक ; महिलेचा मृत्यू तर दोन जण जखमी

इको गाडीला ट्रकची धडक ; महिलेचा मृत्यू तर दोन जण जखमी

चोपडा – प्रतिनिधी

शिरपूर कडून चोपडा शहराकडे येत असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने या अपघातात इको गाडीत बसलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर गाडीच्या चालकासह गाडीत बसलेल्या दोन महिला जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

हा अपघात चोपडा-शिरपूर रस्त्यावर हातेड बु! जवळ झाला. याबाबत ग्रामीण पोलिसात मालवाहू ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,चालकाला अटक करण्यात आली आहे.

बारडोली (गुजरात) येथील नितेशभाई साहेबराव भोई (३०), सेवकाबाई महादू भोई (५०), गंगुबाई राजाराम भोई (७०), मुन्नीबाई तुकाराम भोई (५२) हे सर्वजण गुजरात येथून इको क्रमांक-GJ- ३४ H-२१५० या गाडीने १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरपूर मार्गे जळगाव जाण्यासाठी चोपडा शहराकडे येत होते.

इको गाडीच्या मागून भरधाव वेगाने येणारी आयशर ट्रक क्रमांक- RJ- २५-GA-७६७४ या मालवाहू ट्रकने इको क्रमांक-GJ- ३४ H-२१५० या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली यावेळी झालेल्या गंभीर अपघातात इको गाडीत बसलेल्या सेवकाबाई महादू भोई (५०) यांचा जागीच मृत्यू झाला तर इको चालक नितेशभाई साहेबराव भोई (३०), सेवकाबाई महादू भोई, (५०), गंगुबाई राजाराम भोई (७०), मुन्नीबाई तुकाराम भोई (५२) हे जखमी झाले असून, त्यांचेवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी इको गाडीचा चालक नितेशभाई साहेबराव भोई (३०) रा.बारडोली (गुजरात) यांच्या
फिर्यादीवरून आयशर ट्रकचा चालक मोहंम्मद अझरुद्दीन भरपूर खान (३१) रा.सवाई माधोपूर (ता.जि.सवाई माधोपूर) राजस्थान याचे विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा
दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंखे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या