Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीच्या (ED) ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी प्राधिकरणाने (ED Authority)नवाब मलिक यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगी दिली आहे. अलीकडेच मलिक यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी एका न्यायप्रणाली प्राधिकरणाने केली होती. त्यात गोवाला कंपाऊंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेला दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad district) १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे.

दरम्यान,मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करत आहे. तसेच या मालमत्ता मलिक यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत. तर मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...