Friday, November 15, 2024
Homeराजकीयजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची ED मार्फत चौकशी

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची ED मार्फत चौकशी

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मिरातील वादग्रस्त नेते आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला (former J&K CM Farooq Abdullah) यांची जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशिएशनमधील (J&K Cricket Association) भ्रष्टाचाराची ईडी (Enforcement Directorate – ED) मार्फत चौकशी सुरू झालीय. या प्रकरणी ईडीने काही महिन्यांपूर्वी अब्दुल्ला आणि इतर आरोपींच्या विरोधात श्रीनगरच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीची ही चौकशी सीबीआयद्वारे काही कोटींच्या घोटाळ्यासंबंधी दाखल झालेल्या एफआयआरशी निगडीत आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गडबड आढळली होती. हे प्रकरण २०१२ मध्ये उघड झाले. ज्या काळातील व्यवहारांविषयी तक्रार दाखल झाली होती त्या काळात फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात जम्मू काश्मीर बँकेतील जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी फारुख अब्दुल्लांची चौकशी केली.

काय आहे प्रकरण ?

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंजूर वजीर यांनी मार्च २०१२ मध्ये संस्थेचे सरचिटणीस मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष अहसान मिर्झा यांच्या विरोधात पोलिसांकडे आर्थिक गैररव्यवहार प्रकरणी तक्रार केली होती. पोलिसांना प्राथमिक तपासातच भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आले. काही दिवसांनी या भ्रष्टाचार प्रकरणी एक यादी सार्वजनिक झाली. या यादीत भ्रष्टाचाराशी संबंधित ५० जणांची नावं होती. ही यादी सार्वजनिक झाल्यानंतर फारुख अब्दुल्लांनी जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सोडले होते.

फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात २००५ ते २०१२ दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात इडीने आतापर्यंत तपास करुन २.६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. पुढील तपासासाठी फारुख अब्दुल्लांची चौककशी करण्यात आली.बीसीसीआयकडून २००५ ते २०१२ या कालावधीत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनला ९४.०६ कोटी रुपये मिळाले. या निधीतून असोसिएशनने जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेटचा विकास व्हावा, जास्तीत दर्जेदार क्रिकेटपटू निर्माण व्हावे यासाठी काम करणे अपेक्षित होते. बीसीसीआयने जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या जम्मू काश्मीर बँकेतील तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये निधी जमा केला होता. हा सर्व निधी मिळून ९४.०६ कोटी रुपये होते. इडीचा आरोप आहे की, क्रिकेटच्या नावाखाली जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने तीन बँक खाती उघडून बीसीसीआयला सांगितली होती. या व्यतिरिक्त आणखी काही बँक खातीही क्रिकेटच्या पैशांसाठी चालवली जात होती. या खात्यांमधून पैसे फिरवून नंतर ते क्रिकेट ऐवजी भलत्याच हेतूने वापरले जात होते. हा आर्थिक गैरव्यवहार बिनबोभाट सुरू होता. पैशांच्या या अफरातफरी प्रकरणी इडीची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या