Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूज१५ हजार पगार, पण घरात सापडली कोट्यावधींची रोकड; येवढी मोठी रक्कम पाहून...

१५ हजार पगार, पण घरात सापडली कोट्यावधींची रोकड; येवढी मोठी रक्कम पाहून ईडीचे अधिकारीही झाले अवाक्

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे, त्यातच आदर्श आचारसंहिता ही लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. येथे मनि लॉंडरिंग अॅक्ट अर्थात पीएमएलएअंतर्गत सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

ईडीने राज्य सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवाकडे नोकरीवर असणाऱ्याच्या घरी धाड टाकली आहे. या नोकराच्या घरी जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची रोकड आढळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपासात आलमगीर आलम यांचे नाव समोर आले होते. आलमगीर यांच्या मंत्रालयात मोठा भ्रष्टाचार सुरू असून त्यातील पैसा नोकराच्या घरी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली.

- Advertisement -

ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच या नोकऱ्याच्या घरावर छापा मारला. या नोकराच्या घरात 500-500 च्या नोटांचे बंडल भरुन ठेवण्यात आल्याचे उघड झाले. या नोकराला महिन्याला १५ हजार पगार मिळत होता. तपास अधिकाऱ्यांनी एक एक करुन या सर्व बॅगा घरातच रिकाम्या केल्यानंतर नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले. जेव्हा या नोकराच्या घरी कारवाई सुरू होती तेव्हा कुणीही याच्या घरात कोट्यवधीच घबाड सापडेल असा अंदाज बांधला नव्हता. त्याच्या घरी इतकी रोकड पाहून अधिकारी अवाक् झाले. सध्या या नोटा मोजण्याचे काम सुरु आहे.

सध्या या नोटा नेमक्या कुठून आल्या? याची चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने सोमवारी पहाटेच्या सुमारास झारखंडमधील रांची शहरात अचानक छापेमारी केली. छाप्यामध्ये दीड कोटी रुपयांचे दागिने आणि लाखोंची रोकडही सापडली होती. यानंतर ईडीने तपासासाठी IIR म्हणून जमशेदपूर मॉनिटरिंग स्टेशनमध्ये ग्रामीण विकास विभागाच्या एका अभियंत्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या