Thursday, June 20, 2024
Homeमुख्य बातम्यादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स; उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे समन्स; उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावले आहे. दिल्लीतील अबकारी धोरण आणि मद्यविक्री घोटाळा प्रकरणात ईडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी देखील सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली होती.

ईडीने दिल्लीच्या मद्य धोरणातील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्र्यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते.

दरम्यान आपच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आलेल्या ईडी समन्स बद्दल बोलताना, अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबर रोजी अटक केले जाईल अशी भीती असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात सीबीआय अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यात आली आहे, मात्र आता पुन्हा त्यांना बोलवण्यात आले आहे.

आम आदमी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडवरुन अरविंद केजरीवालांना आलेल्या ईडीच्या समन्सबाबात प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आम आदमी पक्षाचा संपवणे, हेच केंद्र सरकारचे ध्येय आहे. केंद्र सरकारला खोटा गुन्हा तयार करुन अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये बंद करायचे आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्या आधारावर समन्स बजावण्यात आला आहे आणि त्यांना काय प्रश्न विचारले जातील याबद्दल ईडीने अधीकृतरित्या माहिती दिलेली नाहीये. मात्र तपास यंत्रणांकडून दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये त्यांच्या नावाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या घेण्यात आले आहे. ईडीने चार्जशीटमध्ये दावा केला आहे की संपवण्यात आलेले वादग्रस्त आबकारी धोरण हे केजरीवाल यांचे ब्रेनचाइल्ड होते.

कुठल्याही किंमतीत आम आदमी पक्षाला संपवणे हेच केंद्र सरकारचे उदिष्ट आहे, असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना भाजपचा तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप देखील सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या