Wednesday, April 30, 2025
Homeनगरशिक्षण समितीच्या सदस्यांचा मासिक सभेतून वॉकआऊट

शिक्षण समितीच्या सदस्यांचा मासिक सभेतून वॉकआऊट

जिल्हा परिषद : अधिकारी माहिती देत नसल्याने सदस्य संतप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मासिक सभा मंगळवारी पार पडली. या सभेत अधिकार्‍यांना विचारलेली माहिती मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी सभेतून वॉकआऊट करणे पसंत केले. बैठकीत कोपरगाव तालुक्यात पोलिसांनी पकडलेल्या शालेय पोषण आहाराचे वाहन शहरी की ग्रामीण भागातील यांची माहिती अखेरपर्यंत शालेय पोषण आहार अधीक्षकांना देता आली नाही.

- Advertisement -

जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शिक्षण समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, विमलताई आगवण, उज्ज्वला ठुबे उपस्थित होत्या. सभेच्या सुरुवातीला जिल्हा स्तरावरील पथक व तालुकास्तरावरून शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी आठवड्यात चार शाळा भेटी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आठवड्यात 6 शाळा भेटी व केंद्रप्रमुखांनी आठवड्यात 10 भेटींचे उद्दिष्ट देण्यात आले.

मात्र, त्यानंतर सदस्य परजणे यांनी कोपरगाव तालुक्यात पकडलेला शालेय पोषण आहाराचा ट्रक पोलीस ठाण्यात कसा पोहचला. हा ट्रक शहरी की ग्रामीण भागाचा याबाबत जिल्हा स्तरावरील पोषण आहार अधीक्षक यांना महिनाभरानंतर देखील माहिती देता आली नाही. यासह जामखेडचे गटशिक्षणाधिकारी यांना शाळा भेटीबाबत विचारण्यात आलेली माहिती देता आली नाही. सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी बदली झालेल्या शिक्षकांच्या सुनावणीनंतर दोन महिन्यांनी कारवाई कशासाठी, क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी न होणार्‍या शाळांवर कारवाई का केली नाही. केंद्र प्रमुखांच्या जागा रिक्त असून त्यावर कार्यवाही करणार आदी प्रश्‍न विचारले.

सभा संपण्यापूर्वी उपाध्यक्षा घुले आणि त्यानंतर सदस्य जालिंदर वाकचौरे सभेतून गेले. मात्र, त्यानंतर परजणे, कानवडे आणि ठुबे यांनी सभा चालवी. पण अधिकार्‍यांकडून उत्तरे मिळत नसल्याने त्यांनी सभेतून काढता पाय घेतला.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यासदौरा
शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सदस्यांचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अभ्यास दौरा होणार आहे. हा म्हैसूर, हैदराबाद या ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले. आधी दौर्‍यासाठी 23 डिसेंबर तारीख निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम समोर आल्याने हा दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे.

बहुदा शेवटची सभा
शिक्षण समितीच्या सभापती घुले यांची ही शेवटीची सभा ठरणार आहे. पुढील मासिक सभा येईपर्यंत जिल्हा परिषदेत नव्याने पदाधिकारी यांचे मंडल अस्तित्वात येणार आहे. यामुळे उपाध्यक्षपदी देखील नवीन व्यक्तीला संधी मिळणार असून यामुळे घुले यांची ही शेवटी सभा ठरणार आहे. मात्र, विद्यमान उपाध्यक्ष घुले यांना यापेक्षा मोठा पदावर संधी आहे. पदाधिकारी बदले तरी समितीचे सदस्य तेच राहणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया;...

0
मुंबई । Mumbai उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक संकेत दिल्याने मनसे-ठाकरे...