Friday, April 25, 2025
Homeनगरगुरूजींच्या अध्यापनाचे उद्दिष्ट तपासा

गुरूजींच्या अध्यापनाचे उद्दिष्ट तपासा

उपसंचालक आत्तार || क्षेत्रिय अधिकार्‍यांना दिले आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील क्षेत्रिय अधिकार्‍यांनी जबाबदारीने शाळा भेटी कराव्यात. वर्ग भेट करत असतांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्यात यावी. शिक्षकांच्या अध्यापनाची तपासणी करताना पाठ्य पुस्तकातील पाठाचे उद्दिष्ट साध्य होते का ? अभ्यासक्रमाची पूर्तता केली जात आहे काय? विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सातत्यपूर्ण व निकषांवर आधारीत आहे काय ? विद्यार्थ्यांच्या परीक्षामधील उत्तर पत्रिकांची तपासणी करण्यात येते ? याची क्षेत्रिय तपासणी अधिकशार्‍यांनी सखोल चौकशी करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालक हरुण आत्तार यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय गुणवत्ता आढावा बैठक विभागीय शिक्षण उपसंचालक आत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती पब्लिक स्कूल येथे शुक्रवार (दि. 10) रोजी पारपडली. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर प्रा. रामेश्वर लोटके उपस्थित होते. बैठकीला जिल्हाभरातून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक), गटशिक्षणाधिकारी, अधिक्षक शालेय पोषण आहार, नगर पालिका व मनपा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, कार्यकारी अभियंता, संगणक प्रोग्रामर व प्रत्येक तालुक्यातील डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हास्तरावरील सर्व समग्रचे कर्मचारी हजर होते. यावेळी शिक्षण उपसंचालक आत्तार यांनी क्षेत्रिय अधिकार्‍यांनी प्रभावी व सखोल शाळाभेट कशी करावी. विद्यार्थ्यांचे, वाचन, खेळाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करत मुख्यमंत्री यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या उपाययोजना उपस्थितांकडून जाणून घेतल्या.

यावेळी आत्तार यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी क्षेत्रिय अधिकार्‍यांना शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील वाचन लेखनाचे महत्त्व अधीरेखीत केले. तसेच क्षेत्रिय अधिकार्‍यांनी जबाबदारीने शाळाभेटी कराव्यात. वर्ग भेट करत असताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करावी. अध्यापनाची पहाणी करताना पाठाचे उद्दिष्ट साध्य केले जात आहे का? अभ्यासक्रमाची पूर्तता केली जात आहे काय? मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वकष केले जाते ? उत्तर पत्रिकांची तपासणी व्यृवस्थित केली जात आहे काय? या बाबी पाहण्याच्या सुचना दिल्या. तसेच शाळाभेटीमध्ये शाळेमध्ये राबविल्या जात असणार्‍या वैशिष्टपूर्ण 2023-24 मध्ये यू डाएसच्या आधार प्रामाणिकरणाचे काम 95.85 टक्के यशस्वीरित्या पूर्ण संबंधितांचा प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. अशोक कडूस यांनी ‘परिक्षा पे चर्चा’, जवाहर नवोदय विदयालय प्रवेश याबाबत मार्गदर्शन केले. बाळासाहेब बुगे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी उल्हास नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम बाबत मार्गदर्शन केले. प्रा. रामेश्वर लोटके अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर यांनी या वर्षातील शिक्षण परिषदांमधील विषयाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तंत्रस्नेही शिक्षक रवि भापकर यांनी शिक्षण विभाग व जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या संकेतस्थळा बाबत सविस्तर माहिती दिली.

कल्पक शिक्षकांची तालुकानिहाय यादी
शिक्षणाधिकारी पाटील यांनी शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी जे शिक्षक परिश्रम करतात. परंतू ते कधीही पडद्यासमोर येत नाहीत. अशा कल्पक व नाविन्यपूर्ण विचार करण्यार्‍या शिक्षकांची यादी तालुकानिहाय सादर करण्याच्या सुचना केले. जिल्हा परिषदेच्या विकसनशील मोठ्या पटाच्या शाळा प्रत्येक अधिकार्‍यांनी दत्तक घेण्याबाबत सुचना केल्या. मुख्यमंत्री 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आपले सरकार पोर्टलवरील तक्रार निवारण तात्काळ करणे, लोकसेवा हक्क अधिनयमांतर्गत नोंदणी व वेळेत सेवा पुरविणे, तक्रार निवारण याबाबत सविस्तर सूचना दिल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...