पुणे | Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस (Exam) राज्यात आज (दि. ११) पासून प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी (Students) कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने (Department of Education) विद्यार्थ्यांना केले आहे.
असे आहेत विद्यार्थी
■ राज्यात १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी
■ ८ लाख १० हजार ३४८ मुले
■ ६ लाख ९४ हजार ६५२ मुली
■ ३७ ट्रान्सजेंडर
■ १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी ३ हजार ३७३ मुख्य केंद्र
■ विज्ञान शाखेचे सर्वाधिक ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी
■ कला शाखा ३ लाख ८१ हजार ९८२ विद्यार्थी
■ वाणिज्य ३ लाख २९ हजार ९०५ विद्यार्थी
■ व्होकेशनल ३७ हजार २२६ विद्यार्थी
■ आयटीआयचे ४ हजार ७५० विद्यार्थी
नाशिक विभागात किती विद्यार्थी?
■ नाशिक विभागात एक लाख ६८ हजार १९५ विद्यार्थी
■ नाशिक जिल्हा ७८ हजार १२३
■ धुळे जिल्हा २४ हजार ५६४
■ नंदुरबार जिल्हा १७ हजार ६६५
■ जळगाव जिल्हा ४७ हजार ८४३
मोदी सरांची ‘परीक्षा पे चर्चा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा ८ वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप त्यांनी केले. तसेच विद्यार्थी व पालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे. शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
‘देशदूत’तर्फे बेस्ट ऑफ लक
विद्यार्थ्यांसाठी
■ विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना स्वतःचे हॉल तिकीट, परिपूर्ण कंपास साहित्य जवळ बाळगावे.
■ पहिल्या दिवशी जाताना एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा.
■ घरून निघताना हलके अन्न घ्यावे.
■ परीक्षेचे दडपण घेऊ नका.
■ अभ्यास करत असताना दैनंदिन व नियमित असलेला अभ्यास करावा, जागरण करू नये.
■ हॉल तिकीटची एक प्रत काढून आपल्या घरी ठेवावी. हॉल तिकीट हरवल्यास घाबरून जाऊ नका. आपल्या कॉलेजची व प्राचार्यांशी संपर्क ठेवून केंद्रावर माहिती द्यावी.
■ पेपर लिहीत असताना एकाग्र व मन शांत ठेवून पेपर सोडवा.
■ केंद्रावर पाणी व इतर सुविधाचा लागल्यास उपयोग करा.
■ पेपर संपल्यानंतर प्रश्नपत्रिकेची घडी करून जवळ ठेवा.
■ झालेल्या पेपरसंबंधी मित्रांशी चर्चा करू नका.
■ घरी गेल्यानंतर झालेल्या पेपरवर चर्चा करू नका.
■ जेवण करून काही वेळ विश्रांती घ्या, नंतर दुसऱ्या पेपरची तयारी करा.
पालकांसाठी
■ पाल्यास केंद्रावर सोडवण्यास जाताना वाहनावरून घाई करू नका.
■ पाल्याच्या परीक्षा केंद्रावर किती वाजेपर्यंत पोहोचायचे आहे याचा अंदाज घेऊन व रहदारीचा अंदाज घेऊन वेळेआधी लवकर निघा.
■ परीक्षा केंद्रावर पाल्य केंद्रात जाईपर्यंत थांबा.
■ पाल्यास पेपर झाल्यानंतर किती गुण मिळतील, कसा सोडवला याबाबतीत जास्त विचारू नका.
■ आहाराकडे व सुविधांकडे लक्ष द्या.
■ पाल्याची झोप व विश्रांती परिपूर्ण होण्याची काळजी घ्या.
■ परीक्षेसाठी रात्री अपरात्री पाल्यास जागरण करू देऊ नका.
■ उन्हाची तीव्रता बघून काळजी घ्या.
■ घरातील वातावरण