Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजगुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वनतारा प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्नशील - वनमंत्री गणेश नाईक...

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वनतारा प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी प्रयत्नशील – वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात वन्यप्राण्यांसाठी वनतारा प्राणीसंग्रहालय उभारले जावे, यासाठी उद्योगपती अनंत अंबानी यांना पात्र लिहिणार असल्याचे तसेच याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला देणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. राज्यात सन २००० च्या सुमारास महाराष्ट्रात १०१ वाघ होते. आता या वाघांची संख्या वाढून ४४४ इतकी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत भंडारा जिल्ह्यात वाघांकडून महिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाईक यांनी राज्यात वाघ आणि बिबटयांमुळे निर्माण झालेल्या मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनलगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे. भंडारा वनविभागातील अडयाळ, लाखांदूर येथील मानवी वस्तीनजीक बीटी-१० या वाघिणीच्या २ वर्षांच्या बछडयाने हा हल्ला केला आहे. त्याला जेरबंद करून भंडारा वनक्षेत्रातील कोका नियत क्षेत्रात सोडण्यात आल्याचे गणेश नाईक म्हणाले.

राज्यात एकूण ६१९९१.८९ चौ.कि.मी. वनक्षेत्र असून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एकूण ११ प्रादेशिक वनवृत्त आणि २ वन्यजीव वनवृत्त आहेत. तसेच वन्यजीव संरक्षणासाठी राज्यात ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ वन्यजीव अभयारण्ये आणि २८ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यापैकी ५ राष्ट्रीय उद्याने आणि १५ वन्यजीव अभयारण्यांचा समावेश करुन ६ व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...