Friday, June 14, 2024
HomeUncategorizedमालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार-डॉ.भागवत कराड

मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार-डॉ.भागवत कराड

औरंगाबाद – aurangabad

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचे नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी डॉ.कराड बोलत होते. कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या