Monday, May 27, 2024
Homeनाशिकआधुनिक तंत्रज्ञानाने जास्तीचे ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न करावे - श्रीराम शेटे

आधुनिक तंत्रज्ञानाने जास्तीचे ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न करावे – श्रीराम शेटे

ओझे l विलास ढाकणे

अधिकारी ,कामगारांनी साखर कारखान्याचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून काम करत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली झाले त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

रोलर पूजन संचालक दिनकर जाधव व सर्व संचालक मंडळ अधिकारी कामगार यांचे हस्ते करण्यात आले.पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी पूर्वी कादवा ला कुणी ऊस द्यायला तयार नव्हते मात्र संचालक मंडळ, सभासद अधिकारी, कामगार,बँक सर्वांच्या सहकार्याने कादवा ची यशस्वी वाटचाल सुरू आहे. डीस्टीलरी चा पहिलाच हंगाम यशस्वीरीत्या पार पडला आहे.कादवा ने सातत्याने उसाला जास्त भाव देण्याची परंपरा कायम राखत विविध अडचणींवर मात करून ऊस उत्पादकांना संपूर्ण एफ आर पी अदा केली आहे.

ऊस उत्पादकांचा कादवा वर विश्वास असून ऊस उत्पादक कादवा ला ऊस देण्यास प्राधान्य देत आहे त्यासाठी कमी दिवसात जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार असून त्या दृष्टीने अधिकारी व कामगार यांनी समन्वय ठेवत दैनंदिन गाळप कसे वाढेल यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगितले.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी करत जास्तीत जास्त गाळप होईल असे सांगितले . आभार मुख्य अभियंता विजय खालकर यांनी मानले.बॉयलर अटेडंट परीक्षा पास झालेले इंजिनियर व कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा चेअरमन शिवाजीराव बस्ते,दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, दिनकरराव जाधव, शहाजी सोमवंशी, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ,सुखदेव जाधव,सुभाषराव शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनील केदार,.राजेंद्र गांगुर्डे, नामदेव घडवजे, रामदास पिंगळ,

जयराम उगले,अशोक वडजे,सोमनाथ मुळाणे, साहेबराव कक्राळे, गंगाधर निखाडे,कामगार युनियन अध्यक्ष भगवान जाधव,कामगार संचालक संतोष मातेरे,सरचिटणीस अजित दवंगे, माजी कामगार युनियन अध्यक्ष सुनील कावळे, सचिव राहुल उगले, मुख्य अभियंता विजय खालकर, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, आर्थिक सल्लागार जगन्नाथ शिंदे,प्रभारी चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे ,शेतकी अधिकारी मच्छिंद्र शिरसाठ ,कामगार कल्याण अधिकारी गणेश आवारी,स्थापत्य अभियंता शरदचंद्र चव्हाणके,उप लेखापाल सत्यजित गटकळ,राज्य सहकारी बँकेचे अधिकारी माधव पाटील आदींसह सर्व अधिकारी कामगार उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या