Sunday, March 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजआज चंद्रदर्शन झाल्याने उद्या रमजान ईदचा सण साजरा होणार

आज चंद्रदर्शन झाल्याने उद्या रमजान ईदचा सण साजरा होणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पवित्र रमजान महिन्यांचे आज 29 रोजे पूर्ण झाले तर रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान चंद्रदर्शनाची ग्वाही केंद्रीय कमिटीला मिळाल्यानंतर उद्या सोमवारी (दि. 31) मार्चला पवित्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा मोठा सण मुस्लिम बांधव साजरी करणार, असे जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

ईदची मुख्य सामुदायिक नमाज उद्या सकाळी वाजता ऐतिहासिक शहाजानी इदगाह मैदानावर होणार आहे. यावेळी मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरात विविध मशिदींमध्ये सकाळी सात ते नऊच्या दरम्यान ईदची नमाज पठण करण्यात येणार आहे.

दरम्यान मुस्लिम बांधवांनी शिस्तीचे दर्शन घडवत सण साजरी करावा, गोरगरिबांना विशेष मदत करावी तसेच शांततेत सण साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्या जवळील धार्मिक मुख्यालय असलेल्या शाही मशिदीत झालेल्या बैठकीत खतीब ए नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह विविध मशिदींचे इमाम, मौलाना व शहरातील प्रमुख मौलाना उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात बुंदी लाडू प्रसाद विक्री केंद्र सुरू

0
त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आलेल्या भाविकांना आता अल्पदरात बुंदीच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि...