Monday, May 27, 2024
Homeनाशिकदिंडोरी शहरात एकाच दिवशी आठ करोनाबाधित

दिंडोरी शहरात एकाच दिवशी आठ करोनाबाधित

दिंडोरी : Dindori

शहरात एकाच दिवशी आठ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाले असून त्यामुळे शहरातील धोका वाढला आहे. तालुक्यातील वलखेड येथे १ तर जांबुटके येथे १ तर आशे वाडी येथेही एक रुग्ण सापडला आहे.

- Advertisement -

नाशिक बाजार समिती आणि तालुक्यातील मोठ्या कंपन्या यातून स्थानिक संसर्ग वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे. दिंडोरी तालुक्यातील दहिवी येथील रुग्ण मृत्यूनंतर त्याच्याशी संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले आहे. दिंडोरीतील लक्ष्मी निवास २ तर शिवाजी नगर, टेलीफोन कॉलनीत ४ आणि गणेश अपार्टमेंट मध्ये दोन रुग्ण सापडले. त्यात एका लग्नाला काही लोक उपस्थित असल्याची चर्चा आहे. एका दफनविधीला ही मोठया संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या मनात धाकधुकं वाढली आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिंडोरी तालुक्यातील कंपनीतील अधिकारी वर्ग करोना बाधित आढळत असून त्यांचा पत्ता नाशिक असल्याने याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांना द्यायला हवी परंतु तसे होत नाही. त्यामुळे नागरिकांना माहिती होत नसल्याने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या माहितीसाठी सूचना अथवा वेळीच करोनाबाधितांची माहिती दिल्यास नागरिक काळजी घेतील, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

सुमारे १५ दिवस पासून नागरिकांनी पुन्हा शहरात गर्दी करीत असल्याने त्याबाबत महत्वाचा निर्णय झाल्यास पुढील संसर्ग रोखता येणार आहे. शहरात एकाच वेळी इतके रुग्ण वाढल्याने व्यापारी वर्ग धास्तावला आहे. त्यामुळे काय निर्णय घेतला जाईल त्यावर जनता लक्ष ठेऊन आहे.

सरकारी अहवाल बाकी असून खाजगी अहवाल पॉझिटिव्ह निघाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या