Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुमो गाडीचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये कारचा भीषण अपघात (Accident) झाला.या अपघातात आठ जणांचा मृत्यू (Death) झाला असून मृतांमध्ये पाच लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच मृत सर्व लोक एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामधील सुमो गाडी (Sumo Car) जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होती. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावर (Road) उलटल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

तर इम्तियाज राथेर,गुलाम रसूल राथेर यांचा मुलगा, रा. किश्तावार, (४५ वर्ष), अफरोजा बेगम पत्नी इम्तियाज अहमद राथेर रा. किश्तावार, (वय ४०) रेश्मा पत्नी माजीद अहमद, (वय ४०) अरीबा इम्तियाज इम्तियाज अहमद यांची मुलगी,(वय १२) अनिया जान इम्तियाज अहमद यांची मुलगी, (वय १०) इम्तियाजची मुलगी अबान इम्तियाज, (वय ६) मुसैब माजिद माजीद अहमद यांचा मुलगा, (वय १६) माजिद अहमद यांचा मुलगा मुशाइल माजिद, (वय ८) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : पाकला एक थेंबही पाणी देणार नाही –...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५)...