Monday, May 20, 2024
HomeनाशिकNashik Crime News : वडाळ्यात टवाळखोरांचा हैदाेस; आठ जण ताब्यात

Nashik Crime News : वडाळ्यात टवाळखोरांचा हैदाेस; आठ जण ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शांत झालेल्या वडाळा गावात (Wadala Gaon) स्थानिक टवाळखोरांनी पुन्हा एकदा नागरिकांना वेठीस धरुन त्यांच्या जीवास धाेका निर्माण केल्याची घटना घडली आहे. गुंडगिरीपेक्षाही भयानक पद्धतीने हातात लाठ्याकाठ्या घेऊन या टवाळखोरांनी नागरिकांच्या घरांवर दगडफेक करुन एकमेकांना चाेपून हा धुमाकूळ घातला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) आठ जणांना अटक (Arrested) केली आहे. तसेच या टवाळखोरांनी स्थानिकांची वाहने देखील फाेडली आहेत. त्यामुळे परिसरात दंगलसदृश स्थिती तयार झाली हाेती…

- Advertisement -

शहरातील विविध भागात वाहनांच्या तोडफोडीसह (vehicle vandalism) जाळपोळीच्या घटना घडत असताना भारतनगर परिसरातही टोळक्याने मध्यरात्री हा धुमाकूळ घातला. वडाळा रस्त्यावरील भारतनगरमध्ये शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमला. टोळक्याने हातात लाठ्याकाठ्या घेत वाहनांची तोडफोड करुन नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की,उपनिरीक्षक गाेडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेत सहायक उपनिरीक्षक रोहिदास सोनार यांनी फिर्याद दिली.

Nashik News : नाशिक विभागाला मद्यविक्रीतून मिळाला ‘इतक्या’ हजार काेटींचा महसूल

त्यानुसार आठ संशयितांविरुद्ध दंगलीसह सदोष मनुष्यवध करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार अजिम खान (वय १९), गुलाम अन्सारी (२७), रज्जाक शेख (१९), वाजिद चौधरी (३१), साहिल पठाण (२०), तौफिक शेख (२४), अकिल पठाण (१९) आणि गौस शेख (१९) या संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यान्वये, सर्व संशयितांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Jail) करण्यात आली आहे.

फक्त वर्चस्व, धाक दाखविण्यासाठी

संशयितांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली. यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत केवळ परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती तपासात उघड झाली. सर्वजण वय १९ ते ३० या वयोगटातील आहेत. बेरोजगारी आणि मद्याच्या सेवनातून त्यांनी हे कृत्य केले. दरम्यान, या टोळक्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. अशा प्रकारे समाजस्वास्थ बिघडविणाऱ्या टाेळीवर कठाेर कारवाई व्हावी, यासाठी स्थानिक पाेलिस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या