वणी | वार्ताहर Vani
पाटाच्या पाण्यात पडून एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
- Advertisement -
याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास वणी- नांदुरी रोड विश्रामबाग पाडा जवळ असलेल्या पाटात रोहन मनोहर पिठे वय ०८, रा. विश्राम बाग पाडा , ता. दिंडोरी , जि. नाशिक पाटाच्या पाण्यात पडल्याने तेथील लोकांनी त्याचा शोध घेत असताना तो बारा बिगेच्या पाटाच्या पाण्यात मिळून आला.घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तेथील लोकांनी त्यास पाण्याबाहेर काढून औषध उपचारासाठी खाजगी वाहनाने वणी ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी राहुल पटाईत यांनी मुलास तपासून मयत घोषित केले.
याबाबत वणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.