Monday, March 31, 2025
Homeनाशिकबीएनआय नाशिकचा आठवा चॅप्टर सुरू

बीएनआय नाशिकचा आठवा चॅप्टर सुरू

नाशिक | प्रतिनिधी

बीएनआय नाशिकचा आठवा चॅप्टर बीएनआय ब्लेझ आज ३५ सदस्यांसह सुरू झाला. ‘गिरी मीडिया सर्विसेस प्राईव्हेट लिमिटेड’ या नामांकित अॅडव्हर्टायजिंग एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक व ‘बीएन आय ब्लेझ’चे लाँच डायरेक्टर कन्सल्टन्ट सुभाष लगळी यांनी या चॅप्टरची स्थापना, एक्झिक्युटिव डायरेक्टर विक्रम माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

- Advertisement -

आजच्या सभेला गोविंद मालानी, आशिष मालपाणी या डायरेक्टर कन्सल्टन्ट्सचे सहाय्य लाभले. संचालन सुभाष लगळी यांनी तर एज्युकेशन स्लॉटचे संचालन डॉ. अश्विन राजे यांनी केले. आजच्या उद्घाटन सभेत ३७ व्हिझिटर्स व ५३ रेफरल्स सामायिक केले गेले तर ४,५१,००० रुपयांचे व्यवहार पार पडले. ८० सदस्य संपूर्ण सभेला उपस्थित होते.

नाशिकच्या इतर बीएनआयच्या चॅप्टर्सच्या लीडरशिप टीमच्या सदस्यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली. बीएनआय ही ३८ वर्षे जुनी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग संस्था आहे. ज्यात प्रत्येक व्यवसायातील फक्त एका व्यक्तीला एका चॅप्टरमध्ये सामील होता येते. बीएनआयचे जगभरात ७७ वेगवेगळ्या देशांमध्ये, ३०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या व्यवसायांमधून, ३ लाखापेक्षा जास्त सदस्य आहेत. या सर्वांना बीएनआयच्या माध्यमामुळे रेफरल वाढून मोठा व्यावसायिक फायदा झाला आहे.

बीएनआयशी संबंधित असणे म्हणजे डझनभर सेल्स प्रोफेशनल्स तुमच्यासाठी काम करण्यासारखे आहे! कारण प्रत्येक कंपनीला आणि उद्योजकाला विक्रीत वाढ व्हायला हवीच असते. बीएनआय ही एक शास्त्रशुद्धरित्या रचलेली रेफरल नेटवर्किंग सिस्टम प्रदान करते. जी व्यावसायिक संबंध शेअर करण्यात मोलाची भूमिका बजावते.

या संस्थेचे तत्व Givers GainE या संकल्पनेवर आधारित आहे. इतरांना व्यवसाय दिलात, तर तुम्हालाही बदल्यात व्यवसाय मिळेल. जे पेराल ते उगवेल या जुन्या कल्पनेशी नातं सांगणारीच ही संकल्पना होय.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३१ मार्च २०२५ – मानसिकता बदलाची अजूनही प्रतीक्षाच

0
मुलींच्या शिक्षणातील अडथळे अजूनही थांबायला तयार नाहीत. देशाची क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार मुलींच्या शिक्षणाचा विशेष विचार केल्यास केंद्र सरकार सांगते. मुलींना...