Saturday, May 25, 2024
HomeनाशिकNashik NMC News : अखेर उद्यान विभागातून एजाज शेख यांना हटविले; 'या'...

Nashik NMC News : अखेर उद्यान विभागातून एजाज शेख यांना हटविले; ‘या’ ठिकाणी केली बदली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड विभागीय कार्यालयातील (Nashik Road Divisional Office) उद्यान विभागाचा कारभार पाहणारे एजाज शेख यांना अखेर महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) हटविले असून त्यांच्या जागी पूर्व विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय ओहळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेख यांच्या कारभारवरुन नागरिकांकडून थेट पालिका मुख्यालयात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर उशीराने का होइना मनपाने (NMC) शेख यांना उद्यान विभागातून हटवत पाणीपुरठा विभागात बदली केली आहे…

- Advertisement -

भाजप आमदार अ‍ॅड राहुल ढिकले (MLA Adv Rahul Dhikle) यांनी देखील एजाज शेख यांची बदली करण्याची मागणी आयुक्तांकडे (Commissioner) केली होती. गेल्या काही वर्षापासून नाशिकरोडचा उद्यान विभाग कारभारावरुन चर्चेत होता. या विभागात शेख यांच्याकडेच पाच वर्षाहून अधिक काळापासून पदभार होता. त्यांच्या कारभाविरोधात नागरिकांची नाराजी होती. म्हणून काहींनी पालिका मुख्यालयात त्यांच्या तक्रारी केल्या होत्या. तसेच मनसेसह इतर पक्षांकडून त्यांच्या बदलीची मागणी केली जात होती. शेख यांच्या जागी पूर्व विभागाचे ज्यु. इंजिनियर संजय ओहळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेख हे वादग्रस्त ठरत असल्याने आणि गेल्या काही वर्षापासून एकाच विभागात असल्याने त्यांच्या बदलीची मागणी वारंवार केली जात होती. नाशिकरोड विभागात अनेक ठिकाणी झाडे तोडण्याबरोबरच फांद्या विनापरवानी तोडल्याचे प्रकार घडत होते. मात्र याकडे शेख यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होते. त्याच्याकडे तक्रारी करुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. त्यांच्या जागी बदली होऊन आलेले संजय ओहळ यांच्यासमोर आता नाशिकरोड विभागातील कही उद्यानांची झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याबरोबरच अनाधिकृत वृक्षतोडीवर लक्ष ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

दरम्यान, सध्या नाशिकरोडमधील काही उद्यानांची अवस्था वाईट झाली आहे. मनपा कोट्यावधींची उधळ्पट्टी उद्यानांवर करते. मात्र काही ठेकेदारांकडून व्यवस्थितपणे देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र आहे. केवळ बिले काढण्यासाठीच उत्सुकता दाखवली जाते. उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या