Saturday, May 4, 2024
Homeनाशिकएकलहरे वीज प्रकल्प बंद होणार नाही

एकलहरे वीज प्रकल्प बंद होणार नाही

दे. कॅम्प । Deolali

देवळाली विधानसभा मतदारसंघातील महत्वाचा असलेला एकलहरे येथील वीजप्रकल्प बंद करण्याचे कोणतेही नियोजन नसून या बाबद पसरविन्यात येत असलेले वृत्त निराधार आहे,आपण स्वतः पुढील महिन्यात या प्रकल्पाला भेट देणार असल्याचे राज्यचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

देवळाली मतदारसंघातील एकलहरे वीज प्रकल्प बंद करण्यात येणार असल्याचे सांगून तसे ऋत जनते मध्ये पसरविले जात असल्याने काल आमदार सरोज अहिरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत,राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली व सिन्नरच्या प्रकल्पा विषयी गत आठवड्यात जी बैठक झाली त्या बैठकीत एकलहरे येथील 660 मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याचा विषय मांडला गेला का? असा सरळ प्रश्न आमदार सरोज आहिरे यांनी मांडला,

त्याविषयी मंत्री राऊत यांनी सदर बैठकीस आपण उपस्थित नव्हतो, या खात्याचा प्रमुख म्हणून नाशिक च्या एकलहरे येथील औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करण्याचा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. या शिवाय सद्या हा प्रकल्प बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे जनतेने किंवा त्या परिसरातील लोकांनी प्रकल्पा विषयी कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये.

आमदार सरोज आहिरे यांनी प्रकल्पाबाबत जनतेचा आक्रोशा बाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवत राजकारणा पलीकडे जनतेच्या भावना दोन्ही मंत्री महोदयां समोर मांडल्या. या प्रकल्पावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहे तसेच जवळपास पाच हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.

शेतकरी भूमिहीन झाले, या सर्व लोकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आहे, बेरोजगारी वाढू नये याची काळजी घेऊन हा प्रकल्प सुरू ठेवावा लागेल अशी विनंती केली. नाशिक पुणे मुंबईत या सुवर्ण त्रिकोणातील हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे याबाबत सकारात्मक चर्चा केली.

यावेळी ऊर्जामंत्री राऊत यांनी येत्या जानेवारी महिन्यात नाशिकला येणार आहे, तेव्हा स्वतः औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे भेट देणार आहे. तसेच ह्या प्रकल्पा विषयी अजून काय करता येईल याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी आ अहिरे यांनी प्रकल्पग्रस्तांचे जे प्रशिक्षण वर्ग गेल्या जुलै महिन्या पासून बंद आहेत, ते वर्ग सूर करण्यात यावे तसेच ऊर्जा निर्मिती विभागाच्या तिन्ही खात्याची नोकर भरती सुरू करण्यात यावी अशी विनंती केली असता त्यास ऊर्जा मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला

- Advertisment -

ताज्या बातम्या