Monday, November 18, 2024
HomeराजकीयEknath Khadse : आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

Eknath Khadse : आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमधील आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्यामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने आज प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावत आहेत. त्यामुळे काही नेत्यांकडून जनतेला भावनिक साद घातली जात असल्याचंही पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे. तसेच आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही त्यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भावनिक साद घातल्याचे दिसत आहे. मी नाथाभाऊ बोलतोय, येणाऱ्या २० तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहे. यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे’, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

माझी तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार, हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रोहिणी खडसेंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना सहकार्य करावं, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे.

एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथून विधान परिषदेवर आमदार आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री होते. 2009 पासून ते 2014 पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते होते. 1995-99 या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाल्यानंतर खडसे महसूलमंत्री आणि कृषिमंत्री झाले होते. तसेच पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक अशा खात्यांचेही ते मंत्री राहिलेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली. 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय. त्यानंतर परत त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं, मात्र काही दिवसांनंतर परत ते राष्ट्रवादी शरद पवार गटात परतले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या