Sunday, April 6, 2025
Homeमुख्य बातम्याEknath Khadse : "एका महिला IAS अधिकाऱ्याशी..."; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर...

Eknath Khadse : “एका महिला IAS अधिकाऱ्याशी…”; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार (MLA) एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत (IAS Officer) गिरीश महाजन यांचे संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना खडसे म्हणाले की, “गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते (Journalist Anil Thatte) यांनी एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की,गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री अशा, त्यात त्यांनी सविस्तर सांगितले की, महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे, मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी (Amit Shah) मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते”, असेही खडसेंनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “त्यावेळी अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला (Woman) आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. परंतु, महाजन यांनी त्यांना सांगितले की नाही. माझे कामानिमित्त बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असते. पण शहांनी त्यांना सांगितले की तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले”, असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “मला वाटते की खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे रेकॉर्ड तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. मी देखील अमित शहांना भेटणार असून त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चालले आहे ते काय आहे”, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. यावरून आता पुन्हा एकदा खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या आरोपावर गिरीश महाजन काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्र्यांनी ‘त्या’ वक्तव्यावरून मागितली शेतकऱ्यांची माफी; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव...