मुंबई | Mumbai
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आजपासून (दि.२७) सुरूवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात वेगवेगळ्या घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीही विधानभवनात भेट झाली. त्यानंतर दोघांनीही एकाच लिफ्टमधून प्रवास केला.जवळपास दोघांनी तीन मिनिटे सोबत प्रवास केला. तसेच भाजपचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी दोघांमध्ये हास्यविनोद झाला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिले. त्यामुळे आजचा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस दुपारपर्यंत विविध कारणांनी चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळले.
हे देखील वाचा : अजित पवारांकडून राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर
त्यानंतर आता भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ समोर आला असून यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसाळ यांच्याशी बोलताना ‘मागून येणाऱ्यांना संधी मिळते’, असे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमधील खदखद पुन्हा एकदा समोर आली असून या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : विधानभवनात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास; काय झाली चर्चा?
विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ हे दोघे गप्पा मारताना सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावेळी एकनाथ खडसे हे माधुरी मिसाळ यांच्याशी बोलताना ‘मागून येणाऱ्यांना नव्याने आधी संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना त्या व्हिडीओत रेकॉर्ड झाले आहे. या संभाषणावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) हे देखील उपस्थित होते.त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली असून एकनाथ खडसे यांनी हे विधान नक्की कुणाला उद्देशून म्हटले, याबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा : “मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा”; उद्धव ठाकरेंचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.मात्र, त्यांच्या या पक्ष प्रवेशाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यातच आता भाजपने त्यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadase) यांना केंद्रात मंत्रिपद दिले आहे. तर काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती.तेव्हापासून खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला असून ते भाजपम्ध्य्ये प्रवेश नेमका कधी करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा