मुंबई
गेली ४० वर्ष ज्या पक्षात घालवली त्या भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचांकडे हा राजीनामा दिला आहे.
- Advertisement -
खडसे यांनी राजीनामा पत्र केवळ दोन ओळीचे आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या वैयक्तीक कारणावस्तव मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हे राजीनामा पत्र २१ ऑक्टोंबर रोजीच दिले आहे.
राजीनामा पत्रात खडसे यांनी काहीच उल्लेख केला नसला तरी नंतर सर्व नाराजी पत्रकार परिषदेत माझी नाराजी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, मी भाजपा नाईलाजाने सोडत आहे. ४ वर्ष मला प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. नाथाभाऊ हा टिंगल करण्याचा विषय केला गेला. माझी यूट्यूबवरची भाषणं ऐका, मी म्हटलंय, मला पक्षाबाहेर ढकलतायत असं मी म्हटलं आहे.