Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune Rave Party Raid : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई; रेव्ह पार्टीवर छापा,...

Pune Rave Party Raid : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई; रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचा जावई रंगेहाथ पकडला

पुणे | Pune

शहरातील उच्चभ्रू वसतीतील खराडी भागातील (Kharadi Area) स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा (Raid) टाकत पाच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, पार्टीदरम्यान अमली पदार्थ, दारू व हुक्काचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

यामध्ये एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) जावई आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचा (Rohini Khadse) पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खराडीतील ही रेव्ह पार्टी ‘हाउस पार्टी’च्या नावाखाली सुरु होती. रॅडीसन हॉटेलच्या मागे असलेल्या एका इमारतीतील गेस्ट हाऊसमध्ये (Gust House) हा प्रकार सुरू होता. बनसोडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या सदनिकेत हा प्रकार घडत होता. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने रात्री उशिरा छापेमारी करत अमली पदार्थ, हुक्का आणि विदेशी दारू जप्त केली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) पार्टीतील पाच ते सात जणांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पुणे पोलिस करत असून, रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तर अटक केलेल्यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. या कारवाईने पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या अशा गुप्त पार्ट्यांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील समजले जाणारे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची मंगळवारी बदली करण्यात आली. सिंघल यांच्या...