मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील ही महायुतीमधील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आला नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. महायुतीमधील खाते वाटपावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु महायुतीचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ आजारी आहेत. त्यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असलातरी मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत. एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याचे समोर आलेय. एकनाथ शिंदे यांच्यावर ज्यूपिटर रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. सतत ताप येत असल्यामुळे त्यांना अँटी बायोटिक औषधे सुरू करण्यात आली आहेत. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना सर्व बैठका रद्द कराव्या लागल्या आहेत. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.
एकनाथ शिंदे यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यातच अंगात तापही आहे. अशक्तपणा आल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आले. डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे जाणवत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची चाचणी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत महायुतीच्या बैठकीनंतर मुंबईत न थांबता साताऱ्यातील आपल्या मुळगावी दरेगावी गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
त्यानंतर शिंदे रविवारी दुपारी ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सर्व बैठका भेटी गाठी रद्द केल्या. त्यांना अशक्तपण जाणवत होता. त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत होत्या. त्यांची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून काही चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
आता जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नसल्याने ते कुठेही बैठकीला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. आता ते ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. मात्र, डॉक्टर त्यांना ॲडमिट करण्याचा सल्ला देणार की घरीच आरामाचा सल्ला देणार हे पाहणेही महत्त्वाचे आहे.