Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्र"कुणालाही पाठीशी घालू नका, राजकीय दबावाला बळी पडू नका"; मुख्यमंत्री शिंदेंचे 'त्या'...

“कुणालाही पाठीशी घालू नका, राजकीय दबावाला बळी पडू नका”; मुख्यमंत्री शिंदेंचे ‘त्या’ प्रकरणासंबंधी पोलिसांना निर्देश

मुंबई | Mumbai

पुणे शहरातील (Pune City) कल्याणीनगर भागात (Kalyaninagar Area) वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. वेदांत चालवत असलेली ही पोर्शे कार भरधाव वेगात असल्याने एका बाईकला धडकली होती. त्यामध्ये बाईकवर बसलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू (Death)झाला होता.

- Advertisement -

त्यांनतर या घटनेतील आरोपी असणाऱ्या वेदांतला तातडीने जामीनही (Bail) मिळाला होता. त्यामुळे राज्यासह पुण्यातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधत कुणालाही पाठीशी घालू नका, असे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांना फोन करून याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनीही या प्रकरणातील कारवाईमध्ये दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी पोलिसांना (Police)दिल्या आहेत.

दरम्यान, याप्रकरणी ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुणे पोलिसांनी
वेदांत अग्रवाल याने ज्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले होते आणि तो ज्या पबमध्ये गेला होता, तेथील मालक, मॅनेजर आणि बार टेंडरलाही ताब्यात घेतले आहे. तर आज (दि.२१) रोजी पहाटेच्या सुमारास पुणे पोलिसांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून उद्योजक विशाल अग्रवाल यांनाही ताब्यात घेतले असून या सर्वांना न्यायालयात (Court) हजर केले जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या