Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: ऐन निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेचा सुनील राऊतांना फोन, नेमकं काय...

Eknath Shinde: ऐन निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ शिंदेचा सुनील राऊतांना फोन, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नेते टोकाची विरोधी भूमिका घेताना दिसून येतात. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप करत असून खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसून येतात. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे. त्याच संस्कृतीचे दर्शन घडल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराचा सामना करत आहे. त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता माजी सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली आहे.

संजय राऊत यांच्यावर काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, सोमवारी संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी फोन करुन लवकर बरे व्हा.. असा आपुलकीचा संवाद साधला आहे. याबाबतचा व्हिडीओ ही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकरणातील कट्टर विरोधक आहे. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे की, कट्टर शत्रू किंवा विरोधक जरी असला तरी संकटाच्या वेळी सगळे धावून जातात. त्याचीच प्रचिती देणार एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ समोर आला आहे. एकनाथ शिंदेवर संजय राऊतांवर टीका करायचे परंतु आज एकनाथ शिंदेंनी राऊत यांच्या भावाला फोन करत काळजीने फोन करत विचारपूरस केली आहे. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा दिल्या. तसेच हॉस्पिटलमधून घरी कधी आणले याची चौकशी आणि लवकर बरे व्हा असा निरोप देखील दिला आहे.

राजकीय आणि सामाजिक जीवनापासून दोन महिने दूर राहण्याचा निर्णय
खासदार संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील दोन महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. याबाबतची सोशल मिडीया पोस्ट ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले, अनेकांनी “काळजी घ्या”, लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांना दिल्या. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर संजय राऊत यांनी धन्यवाद my dear Aaditya असा रिप्लाय ही केला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...