Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: दिल्ली विजयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; भाजपचे अभिनंदन, आता मुंबई महापालिकेची...

Eknath Shinde: दिल्ली विजयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; भाजपचे अभिनंदन, आता मुंबई महापालिकेची निवडणूक…

मुंबई | Mumbai
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे याआधीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या आप पक्षाला यावेळी दिल्लीकरांनी चांगलाच ठेंगा दाखवला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशभरात भाजपाकडून जल्लोष केला जातोय. भाजपाच्या या आनंदात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजप नेतृत्वाचे अभिनंदन करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीतील भाजपचा विजय हा मोदींच्या गॅरंटीची जादू आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेले ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केले आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद,” अशा भावनाही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

तसेच, केंद्र सरकारने नुकतेच अर्थसंकल्प सादर केला.घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावी म्हणून केंद्राने अनेक योजना आणल्या. या निवडणुकीच्या माध्यमातून देश आर्थिक महासत्ता होईल यावर मतदारांनी विश्वास व्यक्त केला. इंडिया आघाडी जेव्हा जिंकते तेव्हा सगळे चांगले. इंडिया आघाडीचा पराभव झाला की संस्था भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला जातो. शिव्या देणे चालू होते. लोकांना काम हवे आहे. कल्याणकारी योजना हव्या आहेत. लोकांना विकास हवा असतो, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केली.

मुंबई जिंकणार
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना त्यांनी आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. आम्ही महापालिकेची निवडणूक जिंकणारच आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “गेल्या अनेक वर्षांत मुंबईकरांच्या तिजोरीची सफाई करण्यात आली आहे. आता मात्र मुंबई बदलत आहे. मुंबई लुटणाऱ्यांना मुंबईकर जागा दाखवतील. आम्ही मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार आहोत. दिल्लीतील विजयाप्रमाणे विजयाची ही परंपरा कायम सुरु राहील. हे पत्रकार परिषद घेऊन शिव्याशाप देण्यासाठी एकत्र येतात. आम्ही कामासाठी एकत्र येतो, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...