Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उचलले महत्वाचे पाऊल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये; बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी उचलले महत्वाचे पाऊल

मुंबई | Mumbai
बांगलादेशमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अराजकता माजली आहे. त्या पार्श्वभुमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांना मायदेशात परतण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे पाऊले उचलली आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या उपाययोजना
बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधण्यास आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.

- Advertisement -

बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...