Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

नागपूर | Nagpur

गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्याचा शेतीला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकरी प्रश्नावर गाजल्याचे दिसून आले.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी ठाण मांडला होता. संत्री, कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. सरकार केवळ पंचनामे करत आहे, अशा शब्दांत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

आम्हाला घोषणा नको, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

त्यानंतर हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा भार सांभाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. शेतकऱ्यांना पूर्ण मदत करू, असे आश्वासन आज देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या