Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याCM Eknath Shinde : "एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं"; शिंदे गटाच्या...

CM Eknath Shinde : “एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं”; शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर केला जाणार होता, असे धक्कादायक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंचे एन्काऊंटर घडवण्यात कुणाचा सहभाग होता? याबद्दल देखील आमदार संजय गायकवाड यांनी सूचक वक्तव्य केले आहे….

- Advertisement -

ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल; दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु

यावेळी बोलतांना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना दुसरे काहीही दिले जाणार नव्हते, त्यांना मृत्यू दिला जाणार होता. नक्षलवाद्यांच्या (Naxalists)हातून त्यांचे एन्काऊंटर केले जाणार होते. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा गौप्यस्फोट करत आहे,” असे गायकवाड यांनी म्हटले.

Sushma Andhare : “ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन”; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

पुढे ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी ‘मातोश्री’वरून (उद्धव ठाकरेंचं निवासस्थान) फोन आला आणि एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. त्यांना नक्षलींच्या हातून मारायचे होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली,” असा दावाही आमदार गायकवाड यांनी केला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sanjay Raut : “पुरावे असल्याशिवाय आमचे लोक बोलणार नाहीत”; राऊतांकडून सुषमा अंधारेंनी मंत्री भुसेंवर केलेल्या ‘त्या’ आरोपांचे समर्थन

- Advertisment -

ताज्या बातम्या