Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमाझी तब्येत उत्तम, मी फक्त…; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

माझी तब्येत उत्तम, मी फक्त…; रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्ययमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून बरे वाटत नसल्याने ते मंगळवार (दि.3) आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण काही काळातच ते रुग्णालयाबाहेर आले. तेव्हा, माझी तब्येत उत्तम आहे, मी फक्त चेकअपसाठी आलो होतो, असे सर्व माध्यमांसमोर सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या घशात संसर्ग झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत.

- Advertisement -

मागच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावी गेलो होते. त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांना तीन दिवसांपूर्वी १०५ डिग्री ताप देखील आला होता. तिथे त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. त्यानंतर ते परत मुंबईला आले.

काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे एकीकडे राज्यात सत्तास्थापनेची तयारी सुरू असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेल्याची चर्चा झाली. तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने दोन दिवसानंतर ते ठाण्यामध्ये परतले. पण त्यानंतरही त्यांची तब्येत ठीक नसल्याचे समोर आले आणि डॉक्टरांनी त्यांना एका दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...