Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: एकनाथ शिंदेंना नेमके झाले तरी काय? डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत दिली...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना नेमके झाले तरी काय? डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत दिली महत्वाची अपडेट…

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील ही महायुतीमधील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी स्थापनेचा दावा अद्याप करण्यात आला नाही. भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली. महायुतीमधील खाते वाटपावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु महायुतीचे नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ आजारी आहेत. त्यांची प्रकृती अजूनही बरी नाही. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला आले तेव्हादेखील एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आली होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी सकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

दरेगाववरुन दोन दिवसांत एकनाथ शिंदे ठाणे येथील निवासस्थानी आले. त्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाली नाही. आता जुपिटर हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या डेंग्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु त्यांना अशक्तपणा असल्याची डॉक्टरांनी सांगितले. यामुळे त्यांना पुन्हा आरामाचा सल्ला दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...