Monday, July 15, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : “शिंदे गुवाहाटीला असताना राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…”;...

NCP Crisis : “शिंदे गुवाहाटीला असताना राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…”; प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारल्यानंतर तर राज्यातील राजकीय समीकरणे सगळी बदलली आहेत. यातच आता अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा ठोकण्यात येत आहे. मात्र ते आधी आता अजित पवार यांच्या गटाकडून अनेक मोठे गौप्यस्फोट करणार करण्यात येत आहेत. याचदरम्यान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे गुहाटीहाला असताना राष्ट्रवादी भाजप सोबत सत्तेत जाण्यात तयार होती. भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया २०२२ च्या मध्यातच सुरू झाली होती. भाजपसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ५१ आमदारांच्या सह्यांचे पत्र शरद पवार यांना दिलं होतं, असं प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. मात्र भाजप सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय वेळीच घेण्यात पक्ष नेतृत्व अपेक्षित ठरला, असेही प्रफुल पटेल यांनी म्हटले. तसंच पक्ष नेतृत्वाने वेळीच निर्णय घेतल्याने शिंदेंनी संधी साधली आणि सरकार स्थापन केलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं. त्यासोबत शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीचे आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. तसंच शिवसेने सोबत जुळवून घेऊ शकतो तर भाजपसोबत का नाही अशी अनेक नेत्यांची भावना होती. राष्ट्रहितासाठी भाजपची हात मिळवणी करून बहुसंख्या आमदारांसह आम्ही सत्तेत सामील झालो २०२४ च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वात तर विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढणार असेल प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.

NCP Crisis : आ.किरण लहामटेंचं काही ठरेना! काल अजितदादांना समर्थन तर आज म्हणाले, “मी जनतेबरोबर”

पटेल पुढे म्हणाले की, केवळ आमदारच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि तळागाळातील कार्यकर्ते हे सरकारचा एक भाग बनले पाहिजेत. अनेक आमदारांना मतदारसंघासाठी निधी वाटप, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आदी समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी आमची अपेक्षा आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली केली होती. त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी मांडलेल्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना पटेल म्हणाले की, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांना असे वाटते की, जर पक्ष शिवसेनेशी जुळवून घेत असेल तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही.

“अविवाहित राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादीसोबत…”; फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या